पाचोऱ्यात गो. से. हायस्कूलतर्फे शाळा बाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणास प्रारंभ

 

पाचोरा, प्रतिनिधी ।  पाचोरा तालुका शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल येथील शिक्षकांची शाळा बाह्य विद्यार्थ्यांची सर्वेक्षण व कुटुंबीयांची सर्वसाधारण माहिती घेण्यात येत आहे. 

  शाळा बाह्य विद्यार्थ्यांची सर्वेक्षण व कुटुंबीयांची सर्वसाधारण माहिती  घेण्यासाठी श्री. गो. से. शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी शहरातील कॉलनी परिसर पिंजून काढला. शिक्षण विभागाच्या आदेशानुसार दि. १  ते १० मार्च या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील शाळा बाह्य विद्यार्थी शोध मोहीम जोरात राबविण्यात येत आहे.  याकामी श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा शाळेतील सर्व कर्मचारी मेहनतीने सर्वे करत आहेत. या मोहिमेसाठी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विकास पाटील व केंद्रप्रमुख भातखंडे तसेच श्री. गो. से. हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधीर पाटील,  उपमुख्याध्यापिका प्रमिला एम. वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील , एन. आर. पाटील, ए. बी. अहिरे यांच्यासह सर्व कर्मचारी या सर्वेक्षणात सहभागी होऊन कार्य पार पाडत आहेत.

 

Protected Content