जळगावातील चार लाभदायक बाबी ( ब्लॉग )

येथील मल्हार कम्युनिकेशन या ख्यातप्राप्त संस्थेचे संचालक आनंद मलारा हे विविध विषयांवर अतिशय दर्जेदार लिखाणासाठी ख्यात आहेत. लाईव्ह ट्रेंडस् न्यूजवर आपण आता त्यांचे ब्लॉग वाचू शकणार आहोत. यातील हा पहिला भाग.

सध्या आपण भोवताली नजर टाकली असता जळगावातील चार बाबी हा सर्वांसाठी लाभदायक असून याबाबतची माहिती आपल्यासोबत शेअर करावीशी वाटत आहे.

१) पर्यावरणानुकुल वाहने : सध्या पर्यावरणाला हानीकारक असणार्‍या इंधनाच्या ऐवजी पर्यावरणाला अनुकल असणारी इलेक्ट्रीक वाहने अर्थात ई-बाईक्सचे युग आले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. खरं तर या प्रकारची वाहने ही काळाची गरजदेखील आहेत. यात क्रेझी बाईक, यो बाईकसारख्या कंपन्यांची विविध मॉडेल्स उपलब्ध आहेत. याला वापरण्यास काय हरकत आहे ?

संपर्क

क्रेझी बाईक : ९८२३३८७२७८

यो बाईक : ९८२२९१४०८८

२) सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरू असून जळगावच्या तापमानाबाबत तर बोलायलाच नको. यासाठी आवश्यक असणारे एक प्रॉडक्ट म्हणजे ब्ल्यू जेम्स कुल्फीक्स होय. घराच्या भिंती अथवा छतावर याला लावल्यास किमान सात-आठ अंशांनी तापमान कमी होणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे यासोबत तब्बल सात वर्षांची वॉरंटीदेखील देण्यात आलेली आहे. यामुळे आपण याला ट्राय करू शकतात. याबाबतची माहिती सोबतच्या व्हिडीओत देण्यात आली आहे.

संपर्क

ब्ल्यू जेम : ७३५००००७५३

३) गेल्या वर्षी अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. अगदी कुपनलिकासुध्दा आटल्या आहेत. यावर परिणामकारक आणि दूरगामी उपाययोजना म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टींग होय. यासाठी आपल्याला फार काही विचार करण्याची आवश्यकता नाही. कारण जळगाव येथील हिरा रोटो पॉलिमर्स आणि संघवी पाईप या कंपन्यांनी अत्यंत किफायतशीर मूल्यात प्रॉडक्ट उपलब्ध केले आहेत. आपण याच्या मदतीने आपले घर, अपार्टमेंट, व्यावसायिक प्रतिष्ठान, कार्यालय, खासगी वा सार्वजनीक इमारती अथवा कंपन्यांच्या छतावरील पाणी थेट जमीनीत जिरवू शकतात.

संपर्क

हिरा रोटो पॉलीमर : ९८२३१३८४२४

संघवी पाईप्स : ९८२२०९२९६२

४) जळगाव शहरापासून जवळच निमखेडी परिसरात कांताई नेत्रालयात आय केअर बुटीक सुरू करण्यात आले आहे. यामध्ये कुणीही डोळ्यांसंबंधीच्या सर्व समस्यांचे निराकरण करू शकतो. यामध्ये नंबर चेक करण्यापासून ते जटील शस्त्रक्रियांचा समावेश आहे. येथे अद्ययावत सामग्री आहे. आणि हो…हे चॅरिटीचे हॉस्पीटल असल्यामुळे पैशाबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही.

संपर्क

०२५७-२२५०६५५

Add Comment

Protected Content