भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकीने जात असलेल्या दोघांना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी ७ मे रोजी पहाटे ४ वाजता घडली आहे. याप्रकरणी सकाळी ११ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तेजनारायण सिंग वय ६३ रा. नांदेड हे वृध्द त्यांचे सहकारी आरिफ अन्सारीयांच्या सोबत मंगळवारी ७ मे रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच २० जीबी ५८१) ने जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक (५३) वरून भुसावळकडे जात असतांना त्यांच्या मागून भरधाव वेगाने येणारी अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात तेजनारायण सिंग आणि आरिफ अन्सारी हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना नजीकच्या रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर सकाळी ११ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ योगेश तायडे हे करीत आहे.

Protected Content