व्हॅनमध्ये सापडले ४ कोटी ७० लाख; मुंबई पोलिसांने केले जप्त

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबई पोलिसांनी पवई परिसरात मोठी कारवाई केली आहे. या परिसरात नाकाबंदी असताना एका व्हॅनमधून ४ कोटी ७० लाखांची रोकड मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मुंबईतील पवई पोलिसांनी परिसरात नाकाबंदी लावली होती. त्यावेळी नाकाबंदी दरम्यान व्हॅनमधून ही रोकड प्राप्त झाली आहे. पवई पोलिसांनी आयकर विभाग आणि निवडणूक कार्यालयात याची माहिती दिल्यानंतर निवडणूक अधिकारी त्या कॅशच्या बारकोड स्कॅन केल्यानंतर बारकोड मिस मॅच झाला.

यानंतर आयकर विभागाने या कॅश आणि गाडी आपल्या ताब्यात घेऊन ही रोकड कुठून आणली आणि एटीएममध्ये भरण्यासाठी घेऊन जात होते की, निवडणुकीमध्ये या रोकडचा वापर केला जाणार होता का? या संदर्भात अधिक तपास आयकर विभाग करत आहेत. एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना पैशाचा गैरवापर टाळण्यासाठी पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. पवई पोलिसांनी आता रोकड जप्त केली आहे.

Protected Content