पुण्यात प्लॅट घेण्यासाठी विवाहितेचा छळ

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी। नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पन्नास लाख रुपये आणावेत म्हणून मेहरूण येथील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या चारजणांविरुध्द एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मेहरूण परिसरातील शिरसोलीरोड येथील रहिवासी भारती श्रेयस बांठीया (वय ३२) यांचा विवाह औरंगाबाद येथील श्रेयश सनितीन बांठिया यांच्यासोबत झालेला आहे. लग्नानंतर काही दिवस चांगले गेले त्यानंतर पुण्याला फ्लॅट घ्यायचा असल्याने भारतीने माहेराहून ५० लाख रुपये आणावेत अशी मागणी पतीसह सासरच्यांनी केली. याच कारणावरून भारतीचा पतीसह सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ केला. छळाला कंटाळून भारतीय माहेरी निघून आल्या. याबाबत भारती बांठिया यांनी रविवारी दिलेल्या तक्रारीवरून तिचे पती श्रेयास बांठिया, सासरे नितीन बांठिया सासू जयश्री बांठिया, दीर शशांक बांठिया सर्व रा. जयहिंद कॉलनी तापडिया नाट्यमंदिर जवळ, औरंगाबाद यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा प्राथमिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल नितीन पाटील हे करीत आहेत.

Protected Content