


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या हद्दीत खासगी क्लासमधील दोन अल्पवयीन मुलीवर एका सेवानिवृत्त शिक्षकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
आज डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी पत्रकारांशी बोलतांना बाजारपेठ हद्दीतील एका नराधमाच्या कृत्याबाबतची माहिती दिली. यानुसार संबंधीत व्यक्ती हा सेवानिवृत्त शिक्षक असून तो निवृत्तीनंतर एका खासगी क्लासमध्ये कामाला आहे. याच खासगी क्लासमधील दोन अल्पवयीन मुलीवर त्याने अत्याचार केल्याची माहिती समोर आल्याने त्याच्या विरूध्द भादंवि कलम आणि पोक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, संबंधीत शिक्षक हा शहरातील प्रतिथयश संस्थेतून सेवानिवृत्त झाला असून त्याने खासगी क्लासमधील दोन मुलींची शोषण केल्याची बाब अतिशय धक्कादायक असून त्याला या प्रकरणी ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे. तर, या प्रकरणामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. शिक्षकाच्या पवित्र पेशाला काळीमा फासणार्या या आरोपीविरूध्द कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.



