प्रलंबित मागण्यांसाठी वैद्यकीय अध्यापकांचा “थाळीनाद”; आंदोलनाचा तिसरा दिवस

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | विविध प्रकारचे भत्ते सातव्या वेतन आयोगाच्या प्रमाणे मिळाले पाहिजे, करार पद्धतीने नियुक्त्याचा निर्णय रद्द करावा अशा विविध रास्त मागण्यांसाठी राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापक १४ मार्चपर्यंत विविध प्रकारचे आंदोलन करीत आहेत. सोमवारी ५ मार्च रोजी गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावात कॅन्डल मार्च काढून वैद्यकीय महाविद्यालयाच्या अध्यापकांनी लक्ष वेधून घेतले.

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक असोसिएशनतर्फे राज्यभर आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला आहे. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवारी काळ्या फिती लावून कामकाज केल्यानंतर शुक्रवारी ४ मार्च रोजी सकाळी कॅन्डल मार्च काढण्यात आला होता.

सातव्या वेतन आयोगात मिळणारी करिअर ऍडव्हान्समेंट योजना सातव्या वेतन आयोगात लागू केली पाहिजे, अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांचे शासकीय सेवेत समावेशन केले पाहिजे, सातव्या वेतन आयोगात पदव्यूत्तर पदवी अर्हताधारकाला प्रोत्साहनपर सहा वेतनवाढी लागू केल्या पाहिजे, करार पद्धतीवरील नियुक्तीबाबत ९ फेब्रुवारी २०२२ चा शासन निर्णय रद्द केला पाहिजे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठीच्या अध्यापकांच्या प्रतिनियुक्त्या रद्द केल्या पाहिजे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रोत्साहन भत्याची शासन निर्णयानुसार अंमलबजावणी केली पाहिजे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राबविण्यात येणाऱ्या सरळ सेवा भरती प्रक्रियेत शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या अध्यापकांना प्राधान्य दिले पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी १४ मार्चपर्यंत महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक असोसिएशन विविध प्रकारचे आंदोलन करीत आहे.

सोमवारी ७ मार्च रोजी अधिष्ठाता कार्यालयासमोर दुपारी बारा वाजता महाविद्यालयातील प्राध्यापकांनी थाळीनाद आंदोलन केले. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या.

मंगळवारी ८ मार्च रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती सचिव डॉ.योगीता बावस्कर यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक असोसिएशनचे जळगावचे सचिव डॉ. योगिता बावस्कर, डॉ.किशोर इंगोले, डॉ. अरुण कसोटे, डॉ.संदीप पटेल, डॉ. संगीता गावित, डॉ. इमरान तेली, डॉ. वैभव सोनार, डॉ. भारत घोडके, डॉ. विजय गायकवाड, डॉ. धनश्री पाटील, डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. डॅनियल साजी, डॉ. संदीप सूर्यवंशी, डॉ. गणेश लोखंडे, डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. चेतन भंगाळे, डॉ. श्रीकृष्ण चव्हाण, डॉ. किरण सोनवणे, डॉ. हर्षल महाजन, डॉ. मोनिका युनाती, डॉ. अक्षय सरोदे, डॉ. प्रशांत सरोदे, डॉ. अनिल पाटील, डॉ.श्रीनिवास लोंढे आदि अध्यापकांनी शुक्रवारी थाळीनाद करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

Protected Content