नेरी येथे भव्य स्त्रीरोग निदान शिबिर उत्साहात

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नेरी येथे भव्य स्त्रीरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यास गावातील शेकडो माता-भगिनींनी शिबिराचा लाभ घेऊन खर्‍या अर्थाने महिला दिवस साजरा केला.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे सोमवारी भव्य स्त्रीरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी रुग्णालयातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.माया आर्विकर या गेल्या होत्या. त्यांच्यासमवेत रेसिडेंट डॉक्टरांची टिम देखील उपस्थीती होती. कौटुंबिक जबाबदारीतून आपण स्वतःच्या आरोग्याकडे कसे दुर्लक्ष करतो तसेच चुकीचा आहार, मानसिक ताणतणाव, बैठी जीवनशैली यामुळे विविध समस्या उद्भवत असल्याचे स्त्रीरोग तज्ञांनी स्त्रीयांना समजावून सांगितले आणि स्वत:चे आरोग्य कसे निरोगी ठेवावे, एकदा का तीशी, चाळीशी ओलांडल्यावर कुठल्या तपासण्या करायला हव्यात त्याबद्दलची माहितीही दिली. याशिवाय स्त्रीयांच्या लक्षणांवरुन औषधोपचार लिहून देत काही महिलांना सोनोग्राफी, मेमॉग्राफी याशिवाय शस्त्रक्रियांसाठी रुग्णालयात येण्याचा सल्‍ला देण्यात आला आहे.

या शिबिरात १०० हून अधिक महिला रुग्णांनी सहभाग नोंदविला असून त्यापैकी २८ माता-भगिनींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात येण्याची तारीख देवून गाडीची व्यवस्थाही करुन देण्यात आली आहे. शिबिर यशस्वीतेसाठी पीआरओ रवि तायडे यांच्यासह आशा स्वयंसेविकांनी परिश्रम घेतले.

Protected Content