मू.जे.महाविद्यालयात पेजिनेशन कार्यशाळा उत्साहात

computer workshop

जळगाव, प्रतिनिधी | “आकर्षक व वेगळेपण सिद्ध करणारी डिझायनिंग करायची असेल तर त्यासाठी प्रचंड मेहनत करून त्या क्षेत्रात सातत्य कायम ठेवणे महत्त्वाचे आहे,” असे प्रतिपादन मृदंग इंडिया असोसिएशन कला विभागाचे प्रमुख योगेश शुक्ल यांनी आज (दि.४) येथे केले. ते मु.जे. महाविद्यालयातील जनसंवाद व पत्रकारिता विभागातर्फे आयोजित पेजिनेशन या एक दिवसीय कार्यशाळेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विभाग प्रमुख प्रा. संदीप केदार, प्रा. संजय जुमनाके, प्रा. अभय सोनवणे उपस्थित होते.

 

शुक्ल पुढे म्हणाले की, अनुभवातूनच माणूस घडत असतो. वृत्तपत्रांच्या पानांची मांडणी करत असताना तुमचे अनुभव, तुमचे वेगळेपण दर्शवत असतात. वृत्तपत्र पांनाची डिझाईन करणे, हा सुध्दा पत्रकारितेतील अधिक महत्त्वाचा घटक आहे. वृत्तपत्र सुबक व आकर्षक असल्याने ग्राहक त्याकडे आकर्षित होतात त्यामुळे अधिकचा सराव करा, असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

त्यांनतर इन डिझाईन व फोटोशॉप आदीचे संपूर्ण कार्य त्यांनी समजावून सांगितले. यावेळी अपूर्वा वाणी, दीक्षा वले, राहूल पाटील, आकाश धुमाळ, आकाश बाविस्कर, पल्लवी भांडारकर, सुबोध सराफ, श्रीराम वाघमारे, मनोज रंधे आदी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रा.प्रशांत सोनवणे यांनी सूत्रसंचालन तर प्रा.केतकी सोनार यांनी आभार मानले.

Protected Content