इंग्रज काळात स्वातंत्र्य नव्हतं, पण आत्महत्या होत नव्हत्या, हे आपले अपयश- हभप रामभाऊ महाराज

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भगवंताचे नाव अमृता सारखे गोड आहे. ते आरंभी सुद्धा व शेवटी सुद्धा गोडच आहे. असे तू संतश्रेष्ठ तुकोबाराय यांनी सांगितले आहे. मात्र असा शॉर्टकट मार्ग असताना सुद्धा माणूस आज सुखासाठी अतोनात संपत्तीच्या मागे लागला आहे. त्यामुळे सुखाची प्राप्ती तर होत नाही परंतु अनेक शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागत आहे ही समाजातील आज वस्तुस्थिती आपल्याला बघायला मिळते. ब्रिटिशांच्या काळात आपल्याला स्वातंत्र्य नव्हते मात्र त्यावेळेला दोन वेळचे जेवण पोटभर मिळत होते. कुणीही आत्महत्या करीत नव्हते. असे प्रतिपादन हभप रामभाऊ महाराज राऊत यांनी केले.

सामूहिक विठ्ठल नामजप व नाम संकीर्तन महोत्सवात वैकुंठवासी नथूसिंग बाबा राजपूत दौरा मंडळ सप्ताह प्रसंगी वैराग्यमूर्ती हभप रामभाऊजी महाराज राऊत यांनी अतिशय मार्मिक व मनुष्य देहासाठी आवश्यक त्या सर्व बाबी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीतून सोदाहरण स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, आज आपल्या जवळ पैसा, संपत्ती, गाडी, बंगला, पोटभर जेवण, चैनीसाठी ऐशोआरामाच्या वस्तू असूनही माणसाला सुख नाही. तो वैफल्यग्रस्त असून आत्महत्या सारखा अघोरी मार्ग अवलंबत आहे. हे आपले सर्वांचे अपयश आहे. असे मार्मिक विवेचन येथील सामूहिक विठ्ठल नामजप महोत्सवात किर्तन सेवा देताना ह भ प रामभाऊ जी महाराज राऊत यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, लहान मुलं नेहमी सुखी असतात, आनंदी असतात कारण त्यांना कोणत्याही गोष्टीची लालसा किंवा इच्छा नसते. इच्छा असणारा व्यक्ती नेहमी सर्वात दुःखी असतो. यासाठी संतश्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात नामजप हा सर्व श्रेष्ठ, सोपा आणि सरळ मार्ग आहे. विठ्ठल विठ्ठल हेच किर्तन आहे. सामूहिक विठ्ठल नामजप व नाम संकीर्तन महोत्सवात वैकुंठवासी नथूसिंग बाबा राजपूत दौरा मंडळ सप्ताह प्रसंगी वैराग्यमूर्ती हभप रामभाऊजी महाराज राऊत यांनी अतिशय मार्मिक व मनुष्य देहासाठी आवश्यक त्या सर्व बाबी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीतून सोदाहरण स्पष्ट केले.

यावेळी अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, ह भ प कन्हैया महाराज, ह भ प श्रीपती महाराज, ह भ प रविंद्र महाराज हरणे, ह भ प दुर्गादास महाराज, ह भ प धनराज महाराज अंजाळेकर, ह भ प दीपक महाराज, ह भ प उद्धव महाराज, ह भ प प्रवीण महाराज, निंबा महाराज वाघळुद, श्री नरेंद्र नारखेडे, अनिल नारखेडे, भास्कर नारखेडे, रविंद्रभैया पाटील यासह वारकरी संप्रदायातील संत मंडळी, कार्यकर्ते, यावल रावेर तालुक्यातील भाविक भक्त व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

 

Protected Content