मासुमवाडी येथे चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिला गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । दूधाचे कॅरेट उतरविल्यानंतर रस्त्याने जात असलेल्या दूध वाटप करणाऱ्या वाहनाचे रेस अचानक वाढली. त्यामुळे वाहनाचे स्पीड वाढल्याने वाहनाने समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. ही घटना मंगळवारी सायंकाळी मासूमवाडीतील डायमंड हॉलजवळ घडली. या अपघातात दुचाकीस्वार महिला पुजा वासूदेव तलरेजा (वय ४८, रा. सिंधी कॉलनी) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

 

अधिक माहिती अशी की , शहरातील सिंधी कॉलनीत राहणाऱ्या पुजा तलरेजा या दुचाकीवरुन मासूमवाडीकडे जात होत्या. तर महामार्गावरुन विकास दूधाची (एमएच ०५ आर ७५८०) क्रमांकाचे वाहन दूध वाटप करुन तुकारामवाडीकडे जात होते. एका दुकानावर दूधाचे कॅरेट उतरविल्यानंतर चालक वाहन घेवून पुढे जात होता. यावेळी वाहनाची अचानक रेस वाढून लॉक झाले. त्यामुळे दूधाचे कॅरेटने भरलेली वाहनाने समोरुन येत असलेल्या पुजा तलरेजा यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, पुजा तलरेजा या रस्त्यावर फेकल्या गेल्या. तर त्यांची दुचाकी आणि दूधाचे वाहन हे रस्त्याच्याकडेला असलेल्या गटारीत उलटले.

 

या अपघातात पुजा तलरेजा या गंभीर जखमी झाल्याने परिसरातील नागरिकांनी तात्काळ त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी योगेश बारी व गोविंदा पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतले.

Protected Content