तरुणासह भाऊ व आईला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज । शहरातील पिंप्राळा हुडको येथे आपापसातील भांडणाच्या कारणावरून तरुणासह भाऊ व आईला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, अरिफ शेख असलम (वय-२३) रा. पिंप्राळा हुडको,जळगाव हे आपल्या आई व मोठा भाऊ यांच्यासह वास्तव्याला आहे. मंगळवार ४ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता आरिफ शेख हा घरी असताना त्यांच्या शेजारी राहणारे इकबाल शेख, युसूफ शेख आणि अल्ताफ शेख या तीन जणांनी किरकोळ कारणावरून आरिफ शेख याला मारहाण केली. तसेच त्याचा मोठा भाऊ व आई यांना देखील चापटापट्ट्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. या तिघांनी जिवे ठार मारण्याची धमकी देखील दिली. या संदर्भात आरिफ शेख असलम यांनी शुक्रवार ७ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी इक्बाल शेख, व युसुफ शेख आणि अल्ताफ शेख सर्व रा. पिंप्राळा जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास महाजन करीत आहे.

Protected Content