पाळीव कुत्र्याच्या कारणावरून दुचाकीधारकाला चौघांकडून मारहाण

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज । पाळीव कुत्रा बसलेला असताना त्याच्या जवळून दुचाकी नेऊन त्याला घाबरवल्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत  रामानंदनगर पोलीस ठाण्यात ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या संदर्भात अधिक माहिती अशी की, शेख सलीम शेख निजाम (वय-५२), रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव हे मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. कामाच्या निमित्ताने सलीम हा शुक्रवार ७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास आलेले होते. यावेळी ते दुचाकीवरून जात असताना पाळीव कुत्रा घाबरून पळून गेला. या कारणावरून आशिष संजय सोनवणे व त्याच्यासोबत असलेले इतर तीन जणांनी लाकडी काठीने बेदम मारहाण करून शिवीगाळ केली. या घटनेबाबत शेख सलीम शेख निजाम यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवार ७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण जगदाळे करीत आहे.

Protected Content