Home Uncategorized दुकानदाराला चाकूच्या धाक दाखवून जीवेठार मारण्याची धमकी

दुकानदाराला चाकूच्या धाक दाखवून जीवेठार मारण्याची धमकी

0
51


अमळनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्युज । शहरातील लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्स जवळ जुन्या भांडणाच्या कारणावरून धारदार चाकू दुकानदाराच्या गळ्याला लावून खिशातील दीड हजार रुपये जबरी काढून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

मनोज उर्फ आर्यमान मंगल बिऱ्हाडे रा. राजाराम नगर, अमळनेर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

अमळनेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ज्ञानेश्वर रतन सासोटे (वय-४६), रा.भोईवाडा, पैलाड, अमळनेर हे प्रौढ व्यक्ती आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता ज्ञानेश्वर सासोटे हे त्यांच्या लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे त्यांच्या दुकानात असताना मनोज उर्फ आर्यमान मंगल बिऱ्हाडे हा तिथे आला. जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली आणि हातातील चाकू गळ्याला लावून ज्ञानेश्वर सासोटे यांच्या खिशातून दीड हजार रुपयांची रोकड जबरी काढून नेत जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर ज्ञानेश्वर सासोटे यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार शुक्रवार ७ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता संशयित आरोपी मनोज उर्फ आर्यमान मंगल बिऱ्हाडे यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात त्याला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सहायक फौजदार कुमावत करीत आहे.


Protected Content

Play sound