वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला: चालक फरार

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील खोटेनगर स्टॉप परिसरातून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रक मंगळवारी २९ ऑगस्ट रोजी तालुका पोलिसांनी पकडला. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फरार झालेल्या अज्ञात ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गिरणा नदीतून अवैधरित्या वाळूचा उपसा करून ट्रकमधून जळगावकडून शहरात वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलीस ठाण्याचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक आप्पासो पवार यांना मिळाली. त्यांनी पथकाला ट्रकवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. मंगळवार २९ ऑगस्ट रोजी पोलीस पथकाने शहरातील खोटेनगर स्टॉप जवळ सापळा रचला. त्यावेळी सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी ट्रक क्रमांक (एमटीएस ९५९६) हा अडवला. त्यावेळी पोलिसांना पाहून ट्रकचालक हा ट्रक जागेवर सोडून पसार झाला होता. यात तीन ब्रास वाळू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी वाळूने भरलेला ट्रक जमा केला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री साडेअकरा वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ संजय भालेराव करीत आहे.

Protected Content