नागेश्वरम मंदिराजवळून शेतकऱ्याची दुचाकी लांबविली

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील जाडगाव रस्त्यावर असलेल्या नागेश्वरम मंदिराजवळून एका शेतकऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना सोमवारी २८ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. याबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात अद्याप चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

वरणगाव पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, विलास बुधवार पाटील (वय-४९) रा. जळगाव ता. भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे भुसावळ तालुक्यातील जाडगाव शिवारातील नागेश्वर मंदिराजवळ शेत आहे. सोमवार २८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता ते दुचाकी (एमएच १९ बीबी २१६५) ने शेतात गेले. त्यावेळी मंदिरात मंदिराजवळ त्यांनी दुचाकी पार्क करून लावले दरम्यान अज्ञात चोरट्याने पार्किंगला लावलेली शेतकऱ्याची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेतकरी विलास पाटील यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकी कुठेही मिळाली नाही, अखेर त्यांनी मंगळवारी २९ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार दिली.  त्यांनी दिलेले तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ नागेंद्र तायडे करीत आहे.

Protected Content