तरूणाला चाकूचा धाक दाखवून १० हजाराची रोकड लांबविली; शहर तिघांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील दाणाबाजार येथील एका दुकानासमोर तरूणाला चाकूचा धाक दाखवून खिश्यातील १० हजार रूपये जबरी काढून शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील दाणाबाजार परिसरातील हिंदूस्थान इंटरप्रायझेस दुकानावर तौकीर शेख रउफ शेख (वय-२१) रा. मास्टर कॉलनी इंकरा कॉलेजजवळ हा बसलेला होता. दरम्यान २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता रईस लाला रा. मास्टर कॉलनी यांच्यासह दोन अनोळखी व्यक्ती दुकानासमोर आले. रईस लालाने तौकीर याला बोलावून घेतले. यानंतर रईला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. अनोळखी दोन व्यक्तीपैकी एकाने पोटाला चाकू लावून खिश्यातील १० हजार रूपये रोख बळजबरी हिसकावून घेतले. तसेच जीवेठार मारण्याची धमकी देवून दुचाकीने निघून गेले. तौकीर यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रईस लाला आणि दोन अनोळखी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि चंद्रकांत पाटील करीत आहे.

Protected Content