देशमुख महाविद्यालयात स्वयंसिद्ध कराटे प्रशिक्षण शिबीर

cd9c7d8a 6e91 4c00 955c c364dd27732a

भडगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग व सौ.रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने युवती सभा या उपक्रमांतर्गत सात दिवसीय स्वयंसिद्धा कराटे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थिनींना आत्मनिर्भरतेचे व स्वरक्षणाचे धडे मिळावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. ए.एन.भंगाळे होते. जळगाव जिल्हा कराटे असोसिएशनचे सचिव संदीप मनोरे, उपप्राचार्य प्रा.एस.आर.पाटील, प्रा. जी.एस.अहीरराव, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. दिनेश तांदळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थितांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कुठलीही भिती न बाळगता आत्मविश्वासाने प्रत्येक क्षेत्रात वाटचाल करावी, स्वयंसिद्ध व्हावे, असे आवाहन केले. सूत्रसंचालन साहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डाॅ. सी.एस. पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन साहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डाॅ. अतुल देशमुख यांनी केले.
संदीप मनोरे, कु. मेघना महाजन व कु. कुसूम पाटील यांनी विद्यार्थिनींना सात दिवस कराटेचे प्रशिक्षण दिले.

Add Comment

Protected Content