परीट समाजात आदर्श विवाह

भुसावळ प्रतिनिधी । कोणत्याही प्रकारच्या खर्चाची नासाडी न करता परीट समाजातील वाघ आणि मोकलकर या कुटुंबियांनी आपला मुलगा व मुलगीचा विवाह केला असून याचे समाजातून स्वागत करण्यात येत आहे.

याबाबत वृत्त असे की, सध्या विवाह मोठ्या प्रमाणात पैशांची नासाडी होत असते. यातच वर्‍हाडी आणि पाहुणे मंडळींचा वेळ जातो. तसेच मानापमानामुळे मोठ्या प्रमाणात वाददेखील होत असतात. या पार्श्‍वभूमिवर नांद्रा ता. जळगाव येथील दत्तू शंकर वाघ यांचे चिरंजीव गजानन आणि सस्ती, ता. पातूर, जिल्हा अकोला येथील अशोक विश्‍वनाथ मोकलकर यांची कन्या प्रियंका यांचा नुकताच या सर्व प्रकारांना फाटा देऊन विवाह झाला. खरं तर मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमासाठी मुलाकडील मंडळी सस्ती येथे गेले होते. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी चर्चा करून लागलीच विवाह करण्याचा निर्णय घेतला. लागलीच हार टाकून हा विवाह पार पडला. अर्थात, कोणत्याही प्रकारचा भपका न करता व खर्चाच्या नासाडीला आळा घालून हा विवाह अगदी आदर्श पध्दतीत पार पडला.

या विवाहाप्रसंगी गजानन दत्तू वाघ, दत्तू शंकर वाघ, अरुण मुकुंदा राऊत, ईश्‍वर रमेश जाधव, योगेश ईश्‍वर जाधव आदींसह दोन्ही कुटुंबातील मोजकी मंडळी उपस्थित होती. या आदर्श विवाहाचे परीट समाजातून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येत आहे.

Add Comment

Protected Content