पोलिस स्थापना दिनानिमीत्त विविध कार्यक्रम उत्साहात

ranjeet shirsat

जळगाव प्रतिनिधी । पोलिस दलाच्या स्थापना दिनानिमित्त 2 ते 8 जानेवारी दरम्यान जिल्हा पोलिस दलाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे ओयाजन करण्यात आले आहे. आज शाळकरी मुलांच्या शिस्तबद्ध रॅलीने रेझींग-डे कार्यक्रमांना सुरवात झाली. स्काऊड गाईड, एनसीसी सहीत शाळकरी विद्यार्थ्यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन रॅली काढून रेझिंग-डेचा संदेश शहर वासीयांना दिला. विविध पोलिस ठाण्यात शाळकरी मुलांच्या सहलींचे आयोजनही आज करण्यात आले होते.

शहर वाहतूक शाखा
आज सकाळी वाहतुक शाखेच्या मैदानावर पोलिस निरीक्षक देविदास कुनगर यांच्या उपस्थीतीत, शहरातील विवीध शाळेतील विद्यार्थी, स्काऊड गाईडचे विद्यार्थी सकाळी 9 वाजताच रॅलीसाठी हजर होते. हिरवी झेंडी दाखवून मान्यवरांच्या हस्ते रॅलीचे शुभारंभ करण्यात आले. शहरात प्रमुख मार्गावरुन रॅलीने शहर वासियांना संदेश देण्यात आला. शहरातील लुंकड माध्यमिक विद्यालय, शेठ ला.ना. विद्यालय, आर.आर. विद्यालय, जय भवानी माध्यमिक विद्यालय, सिध्दी विनायक माध्यमिक विद्यालय यांनी सहभाग नोंदविला. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देवीदास कुनगर, पोऊनि दिलीप पाटील, एकनाथ जोशी, मुझफ्फर मास्तर, मेघना जोशी, योगेश पाटील, नामदेव माळी, सोपान पाटील, चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती.

एमआयडीसी पोलीस ठाणे
एमआयडीसी पोलिस ठाण्यात आज दिवसभर दहा विवीध शाळांच्या विद्यार्थ्यांची सहल झाली. शाळकरी विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्याचे स्वागतकक्ष, ठाणे अंमलदार, सीसीटीएनएस, पत्रव्यवहार शाखा, पोलिस ठाण्यातील कोठडी, मुद्देमाल कक्ष आणि गुन्हेशोध पथकाची इंत्यभुत माहिती निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्यासह पोलिस अधीकारी कर्मचाऱ्यांनी दिली. प्रेमाबाई जैन विद्यालय, इकरा शाईन विद्यालय, जयदुर्गा माध्यमीक विद्यालय, बी.यु.एन रायसोनी स्कुलचे शिक्षक आणि विद्यार्थी या सहलीत सहभागी झाले होते.

यांनी घेतला सहभाग
शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देवीदास कुनगर, पोउनि दिलीप पाटील, एकनाथ जोशी, मुझफ्फर मास्तर, मेघना जोशी, योगेश पाटील, नामदेव माळी, सोपान पाटील, चंद्रकांत पाटील तर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक विशाल वाठोरे, संदिप पाटिल, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, तुकाराम निंबाळकर, विश्‍वास बोरसे, ललीत गावंडे, सपना येरगुटला आदींची उपस्थीती होती. विद्यार्थ्यांना बिस्कीट आणि चॉकलेटचेही वाटप करण्यात आले.

Protected Content