हिंगोणा येथे शहीद चौधरी यांच्या स्मारकाचे ना. जावळे यांच्याहस्ते लोकार्पण

यावल, प्रतिनिधी। मुंबई येथे २६ /११ च्या अतिरेकींच्या भ्याड हल्ल्यातील हिंगोणा येथील रेल्वे पोलिस कर्मचारी शहीद मुरलीधर लक्षमण चौधरी यांच्या शहीद स्मारकाचे लोकार्पण ना.हरीभाऊ जावळे यांच्या व शहीद मुरलीधर चौधरी यांचे भाऊ जनार्धन चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले.

हिंगोणा गावात शहीद मुरलीधर लक्ष्मण चौधरी यांच्या ग्रामपंचायत कार्यलयाजवळ त्यांचे स्मारक बांधण्यात आहे. ते २६/११ च्या दहशदवादी हल्यात शहीद चौधरी यांना विरमरण पावले होते. त्याचे मुळगाव हिंगोणा ता. यावल येथे स्मारक बांधण्याची घोषणा करण्यात आली होती. याबाबत सातत्याने पाठलाग करून ना. जावळे यानी पाठपुरावा केला व त्यांच्या आमदार निधीतून शहीद मुरलीधर चौधरी स्मारकाचे काम पूर्ण केले.
आज लोकार्पण सोहळा पार पडला.

यावेळी शहीद चौधरी यांच्या मोठे बंधु यांच्या सत्कार हरिभाऊ जावळे यांच्याहस्ते करण्यात आला. स्मारकाच्या आजू बाजूला कँन्डल लावून श्रध्दाजंली वाहण्यात आली. ना.जावळे यांनी शहीदाच्या स्मारकास मानवंदना दिली. यावेळी जि. प. सदस्या सविता भालेराव, फैजपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वानखेडे, हिंगोणा ग्रा.पं.चे सरपंच सत्यभामा भालेराव, सागर महाजन, कृउबाचे माजी सभापती हिंरालाल चौधरी, अतुल भालेराव, मनोज वायकोळे, राजेद्र महाजन, बाळु कुरकुरे, विजयसिंग पाटील, संजय तायडे, बबलु भालेराव, मयुर कोल्हे यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते .

Protected Content