सातपुडा वनक्षेत्रात वृक्षारोपणाला प्रारंभ

यावल,  प्रतिनिधी । यावल  तालुक्यातील सातपुडा पर्वतीय क्षेत्रातील डोंगर कठोरा व रुईखेडा येथे सामूहिक वनाधिकार प्राप्त जमिनीवर पट्टयांवरील कार्यक्षेत्रात वृक्षारोपणाला सुरवात करण्यात आले. 

यावल तालुक्यातील पर्वताच्या डोंगराळ क्षेत्रात वनांचल फाउंडेशनच्या वतीने वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमास सुरूवात प्रारंभ करण्यात आला. . यावेळी आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष व यावल नगर परिषदचे नगरसेवक तथा युवा सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुंदन  फेगडे यांच्या हस्ते विविध  प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.  या अभीयानाच्या माध्यमातून डोंगराळ क्षेत्रात वृक्षांच्या लागवडीकरिता ५०० आवळा, सिताफळ, रामफळ,जांभूळ,  मोहा, वड, इत्यादी वन औषधींची फळ झाळे उपलब्ध  करुन देण्यात आलीत.  या उपक्रमासाठी वनविभागाच्या माध्यमातुन ७००  बांबु मोफत मिळाले.  त्याकरिता ग्रामीण पातळीवर ग्रामसहभागातून  युवकांच्या पुढाकाराने वृक्ष लागवडीला सुरवात करण्यात आली आहे. यावेळी सामुहीक वनहक्क अध्यक्ष  श्री. प. पु. स्वरूपानंदजी महाराज, डोंगर कठोरा व डोंगरदे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच नवाब तडवी यांच्या वतीने एकुण १२०० झाडांची लागवड करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात आदिवासी पाड्यात आदीवासी बांधवांना रोजगार उपलब्ध व्हावे या उद्दिष्ठाने सदर फळझाडांचे रोपण केले जाणार असुन या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी ग्रामस्थांकडे देण्यात आलेली आहे. याप्रसंगी नगरसेवक डॉ . कुंदन केगडे , सामुहीक वनहक्क चे अध्यक्ष श्री. प. पु. स्वरूपानंदजी महाराज, बाळु किटकुल तायडे, डोंगर कठोरा ग्रामपंचायतचे सरपंच नवाब तडवी,  वसा समन्वयक  दिनेश बारेला  यांच्यासह डोंगर कठोरा व डोंगरदे येथील ग्रामस्थयांच्यासह कार्यक्रमास रूईखेडा वनहक्क समितीचे अध्यक्ष लक्ष्मणसिंग जामसिंग पावरा ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.

Protected Content