पिंपळगाव हरेश्वर येथे उद्या फिरते लोक न्यायालय

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  २३ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११:३० वाजेच्या दरम्यान तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथे फिरते लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव व तालुका विधी सेवा समिती, पाचोरा तथा वकील संघ पाचोरा यांचे संयुक्त विद्यमाने २३ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११:३० वाजेच्या दरम्यान तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथे फिरते लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

दुरावलेले संबंध व प्रलंबित असलेली प्रकरणे, दाखल पुर्व प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यासाठी सदरच्या लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले असुन या लोक न्यायालयातील फौजदारी तडजोड पात्र प्रकरणे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्टच्या कलम १३८ खालील दाखल प्रकरणे, बॅंक वसुली प्रकरणे, वैवाहिक वादा बाबतची प्रकरणे अशा स्वरूपाची प्रलंबित प्रकरणाचा सामंजस्याने मिटविण्यात येणार असुन परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या फिरते लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन दिवाणी न्यायाधीश जी. बी. औंधकर, सह दिवाणी न्यायाधीश मंगला जी. हिवराळे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे यांनी केले आहे.

Protected Content