Home Cities जळगाव होय अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात : संजय राऊत

होय अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात : संजय राऊत

0
101

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता असून त्यांना आपल्या शुभेच्छा अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी आज दिली आहे.

 

आज खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यात ते म्हणाले की, अजित पवार यांची मुलाखत ऐकली नाही. काय आहे त्यात मला माहीत नाही. मुख्यमंत्री व्हायला कुणाला आवडणार नाही? त्यांच्यात क्षमता आहे. त्यांचा अनुभव मोठा आहे. अनेक वर्ष मंत्री आहेत. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटते आपण मुख्यमंत्री व्हावे. अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात. जुगाड करून, तोडफोड करून मुख्यमंत्री झाले. एखाद्याच्या भाग्यात लिहिलं असेल तर होत असतात. माझ्या अजितदादांना शुभेच्छा आहे, असं संजय राऊत म्हणाले.

 

दरम्यान, याप्रसंगी संजय राऊत यांनी सत्ताधार्‍यांवर जोरदार टिका केली. यात त्यांनी शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना लक्ष केले. उद्याची उध्दव ठाकरे यांची सभा ऐतीहासीक होणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला.


Protected Content

Play sound