यावल येथे रमजान ईदचा उत्साह ः सामूहिक नमाजमध्ये आबालवृध्द सहभागी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील मुस्लीम बांधवांचा पारंपारीक पद्धतीने पवित्र रमजान ईद सण मोठया उत्साहाच्या वातावरणात हजारो मुस्लीम बांधवांच्या ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठण करून साजरी करण्यात आली.

 

आपल्या देशात हिन्दू मुस्लीम व सर्व धर्मीय समाज बांधवांची एकता व अखंडता आणी बंधुभाव शांती कायम राहावी कायम राहावी अशी सामुहीक प्रार्थना करीत अखेर मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महीन्याची ईदच्या नमाज पठणानंतर सांगता झाली .

रमजान ईद ही महीन्यातील ठेवले जाणारे रोजे ( उपवास ) संपल्यावर ईद हा आनंदाचा सण साजरा करण्यात येत असतो, शहरातील विविध ठिकाणी मोठया प्रमाणावर मुस्लीम बांधवांच्या वतीने रमजान ईदच्या निमित्ताने पारंपारीक पद्धीने आकर्षक नवीन वस्त्र परिधान करून ईदगाह मैदान आणी शहरातील विविध मस्जिदी मध्ये मोठया संख्येत उपस्थित राहुन नमाजपठण करण्यात आली.

मुस्लीम बांधवांच्या वतीने संपुर्ण महिन्याभरचे ठेवले जाणारे रोजे ( उपवास ) ची सांगता या ईदच्या दिवसी होत असते , यावेळी ईदच्या पुर्व संध्येला महीलांची वस्त्र पासुन तर विविध वस्तु खरेदीसाठी शहरातील मुख्य बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली होती. आज सकाळी सव्वानऊ  वाजता शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवानी येथील जेष्ठ धर्मगुरू मौलाना सम्मीउल्ला कादरीच्या मार्गदर्शनाखाली ईदची सामुहिक नमाज पठन केले.  यावेळी ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी , आमदार शिरीष मधुकरराव चौधरी , कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर, माजी नगरसेवक अस्लम शेख नबी , कॉंग्रेस तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान , युवक कॉंग्रेस फैजान शाह , शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे , शांतता समितीचे जेष्ठ सदस्य विजय सराफ , भगतसिंग पाटील , पुंडलीक बारी , राहुल बारी, नईम शेख, शायर रहीम रजा, सईद शेख, पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर यांच्यासह ईदगाह कमेटीचे सर्व विश्वस्त व आदी मान्यवरांनी उपस्थित राहुन मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्यात .

 

ईदच्या निमित्ताने मुस्लीम बांधवांकडून आपल्या आप्तजनांना शिरखुर्मा खाण्यासाठी आमंत्रीत करण्यात येतांना दिसत होते .ईदच्या शुभ पर्वाला गरीब व अनाथ असलेले मुस्लीम बांधव ईदच्या आंनदाने वंचीत राहू नये यासाठी समाज बांधवांच्या वतीने जकात फितरा मोठया प्रमाणावर मुस्लीमबांधव दान करीत असतात.

Protected Content