सुप्रिम कॉलनीत बंद घर फोडून १ लाखप ९२ हजारांचा मुद्देमाल लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सुप्रिम कॉलनीतील जकारीया नगरात बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा एकुण १ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, मोहम्मद अवेस अब्दुल सत्तार (वय-२३) रा. जकारीया नगर, सुप्रिम कॉलनी जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २० एप्रिल रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांने बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत घरातील कपाटाच्या तिजोरीतून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण १ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे शुक्रवारी २१ एप्रिल रोजी सकाळी पाच वाजता उघडकीला आला. मोहम्मद आवेश यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायंकाळी ५ वाजता  एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.

Protected Content