कुमार चिंथा जळगावचे नवे पोलीस उपअधीक्षक; डॉ. रोहन यांची बदली

जळगाव प्रतिनिधी । सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा जळगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.नीलाभ रोहन यांची आज बदली झाली असून त्यांच्या जागी आयपीएस अधिकारी कुमार चिंथा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रोहन यांना नवीन नियुक्तीचे ठिकाण देण्यात आलेले नाही. चिंथा यांची गेल्या आठवड्यात अमळनेर येथे प्रभारी उपविभाग पोलीस अधिकारी पदावर नियुक्ती झाली होती. याच पदावर आणखी एका अधिकार्‍याची नियुक्ती झाली होती. त्यानंतर कुमार चिंथा यांची भुसावळला प्रभारीपदी बदली झाली होती. तसेच त्यांनी भुसावळ पोलिस उपअधीक्षक पदाचा पदभार दोन दिवसांपुर्वीच स्वीकारला होता. मात्र बुधवारी गृहविभागाने पारीत केलेल्या आदेशानुसार त्यांची जळगाव पोलीस उपअधीक्षकपदी बदल झाली आहे.

Protected Content