बापरे…जळगाव जिल्ह्यात आज २९२ कोरोना पॉझिटिव्ह !

 

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोनाचा कहर कमी होण्यास तयार नसून आज नवीन २९२ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहे. आजच्या रिपोर्टनुसार सर्वाधिक ८२ रुग्ण जळगाव शहर तर त्या खालोखाल जामनेरात ३३ आणि मुक्ताईनगर तालुक्यातील ३१ रूग्णांचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

 

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात एकूण २९२ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ८२ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल जामनेर- ३३, मुक्ताईनगर ३१ तर उर्वरित पुढील प्रमाणे आहेत. पारोळा-१४; पाचोरा -१, चाळीसगाव-१७; रावेर-०८; बोदवड-१९, जळगाव ग्रामीण-२०, चोपडा ००, भुसावळ-१८; भडगाव-१; धरणगाव-०४; यावल-१४; एरंडोल-१७ आणि अन्य जिल्ह्यातील-१ अशी रूग्णसंख्या आहे.

 

दरम्यान, आजच्या बाधितांची संख्या मिळवली असता आजवर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ५ हजार ३०२ इतका झालेला आहे. यातील ३०७९ रूग्ण बरे झाले आहेत. सध्या कोविड केअर सेंटरमध्ये १९१४ रूग्ण उपचार घेत आहेत. आज ८ रूग्णांचा मृत्यू झाला असून आजवर कोरोनाच्या बाधेमुळे मृत झालेल्यांची संख्या ३०९ इतकी झाल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

 

जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ व अमळनेरात सध्या सक्तीचा लॉकडाऊन सुरू आहे. यात जळगावमध्ये दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत चालली असून यामुळे प्रशासनाची चिंता वाढलेली आहे. आज जळगावातही रूग्ण संख्येचा स्फोट होऊन तब्बल ८२ पॉझिटीव्ह पेशंट आढळून आले आहेत. जळगावातही आधीही मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून आले होते. आता पुन्हा संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे.

Protected Content