मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली शिवसेनेच्या मंत्र्यांची तातडीची बैठक


मुंबई (वृत्तसंस्था) मु
ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. ही बैठक शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर होत आहे.

 

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मंत्र्यांच्या बोलावलेल्या बैठकीमागे नेमके काय कारण आहे, याची अधिकृत माहिती अद्याप समजू शकलेली नाही. मात्र, यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या तीनही पक्षांची नियमितपणे संयुक्त बैठक पार पडत होती. परंतू यावेळी फक्त शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक आहे. काही मंत्री व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीसाठी परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे ‘वर्षा’ बंगल्यावर उपस्थित आहेत. बैठकीत संघटनाकत्मक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच सर्व पालिका आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे घेतलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची ही लढाई फक्त सरकारची नाही. वाड्या आणि वस्त्या, कॉलनीजमध्ये नागरिकांच्या करोना दक्षता समित्या बनवा. स्वयंसेवी संस्था, युवकांना यात सहभागी करून घ्या, अशा सूचना दिल्या होत्या. कदाचित याविषयावर देखील आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Protected Content