बनावट नंबर प्लेट लावून दुचाकीची विक्री; दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनाची नोंदणी न करता बनावट नंबरप्लेट लावून बनावट आरसी बुक तयार करत परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार टॉवर चौक ते जिल्हा परिषद जवळ गुरूवारी २१ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता समोर आला आहे. या गुन्ह्यात एकाला अटक करण्यात आली. याप्रकरणी गरूवारी दुपारी १ वाजता शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील टॉवर चौक ते जिल्हा परिषद परिसरात गणेश दिलीप पाटील रा. भातखेडा ता.रावेर आणि शोएब कलिम मन्यार रा. खिरवड ता. रावेर हे दोघांनी दुचाकी विक्री साठी आणली होती. ती दुचाकी अब्दुल अमीन गुलाम नबी मन्यार रा. आव्हाण ता. जाळगाव यांना ऑगस्ट २०२३ रोजी विक्री केली. परंतू ही दुचाकीचा ओरीजनल नंबर (जीजे ०५ एफएम ८८९५) असतांना जळगाव येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी न करता गणेश पाटील आणि शोएब कन्यार यांनी दुचाकीवर (एमएच १९ एटी ९०२३) असा नंबर टाकला. त्यानंतर बनावट आरसी बुक तयार करून विक्री केली होती. त्यामुळे शासनाचा महसूल बुडवून फसवणूक केल्याचे समोर आले. हा बाब शहर पोलीसांच्या लक्षात आल्यानंतर पोहेकॉ संतोष खवले यांनी गुरूवार २१ मार्च दुपारी १ वाजता पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार गणेश दिलीप पाटील रा. भातखेडा ता.रावेर आणि शोएब कलिम मन्यार रा. खिरवड ता. रावेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार सुनिल पाटील हे करीत आहे.

Protected Content