यावल पोलीसांनी मोटरसायकल चोरणार्‍यास केली अटक

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव सावखेडा सिम येथील एका मोटरसायकल चोरणार्‍यास यावल पोलीसांनी अटक केली असुन त्याच्याकडील दोन हिरो कंपनीच्या मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात पोलीसांनी दिलेली माहीती अशी की दिनांक २६ रोजी यावल पोलीसांना एका गुप्त खबर्‍यामार्फत माहीती मिळाल्याने सावखेडा सिम येथील राहणारा जावेद संजु तडवी (वय २२ वर्ष )यास दहिगाव शिवारातुन पकडण्यात यश मिळाले असुन त्याच्याकडे निंभोरा तालुका रावेर या पोलीस ठाण्याच्या परिसरातुन चोरीस गेलेली हिरो कंपनीची मोटरसायकल असल्याची माहीती मिळाली. चौकशी केली असता ही मोटर सायकल निंभोरा परिसरातुन चोरीस गेलेली असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीसांनी चोरटयास खाकी दाखवताच त्यांने दुसरीदेखील चोरलेली मोटर पोलीसांच्या ताब्यात काढुन दिली.

यातील एक मोटरसायकल चोरीसंदर्भात निंभोरा ता. रावेर येथील पोलीस ठाण्यात गु. र. क्र .११ / २० कलम३७९ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल असुन, सीआरपीसी ४१ ( ड )प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे . या गुन्ह्यात अधिक चौकशी करून शोध घेतल्यास आणखी काही चोरी गेलेल्या मोटरसायकलचा या चोरट्याकडुन तपास मिळु शकेल अशी माहीती पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी सांगीतले.

Protected Content