बाजारपेठ पोलिसांनी मनोरुग्णाला दिले नातेवाईकांच्या ताब्यात

भुसावळ प्रतिनिधी । शहरात गत काही दिवसांपासून फिरणार्‍या मनोरूग्णाचे नातेवाईक शोधून त्यांच्या ताब्यात देण्याचे काम बाजारपेठ पोलिसांनी केले आहे.

शहराची ओळख रेल्वेचे मध्यवर्ती जंक्शन म्हणून असुन चारही दिशेला रेल्वे गाड्या ये-जा करीत असतात.भुसावळ शहरात दररोज परराज्यातील वेडसर,मनोरुग्ण,भिकारी येत असतात. असाच एक मनोरुग्ण शहरात गेल्या ५-६ दिवसांपासून फिरत होता.त्याच्या नातेवाईकांचा शोध घेऊन खाकीतील माणुसकी आजही जिवंत असल्याचे हे उत्तम उदाहरण असून मनोरुग्णाला नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याची एक चांगली कामगिरी बाजारपेठचे निरीक्षक व कर्मचार्‍यांनी केली.

कालिका उदयीत नारायण पांडे ( रा. रजियापुर तालुका संडहा जिल्हा अमेठी,उत्तर प्रदेश) येथील रहिवासी मागील आठवड्यापासून भुसावळ शहरात फिरत होता. फिरता-फिरता तो खडका रोड भागातील ममता डेअरी जवळ जाऊन पोहचला.तो वेडसर चाळे करीत असल्यामुळे मोहम्मद तेलहा शरीफोद्दीन यांनी त्यास बाजारपेठ पोलीस ठाण्यात आणले व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर ठाणे अंमलदार वाल्मिक सोनवणे यांना निरीक्षकांनी त्याच्या नातेवाईकाचे शोध घेण्याचे आदेश दिले. संबंधीत इसम मनोरुग्ण असल्यामुळे शोध घेणे खुपच कठीण होते.मात्र बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी तपासाची चक्रे फिरवीत दुसर्‍याच दिवशी अधिकार्‍यांनी शोध लावला. यानंतर त्या इसमाच्या नातेवाईकांना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात बोलवून घेत कालिका उदयीत नारायण पांडे यास बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांनी त्यास ताब्यात दिले.

यावेळी शोध पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, एएसआय तसलीम पठाण, पोहेकॉ.वाल्मिक सोनवणे,पोहेकॉ.मिलिंद कंक,सुनील जोशी,पो. ना.रमण सुरळकर, दिपक कापडणे,पोकॉ.विकास सातदिवे,तुषार पाटील, ईश्‍वर भालेराव, प्रशांत परदेशी यांनी निरीक्षकांच्या आदेशानुसार शोध घेऊनही मनोरुग्ण इसमाला जेवण तसेच कपड्यांची व्यवस्था केली.

Protected Content