वकिलांना विमा संरक्षण कवच द्या ; भुसावळ वकील तालुका संघाची मागणी

भुसावळ, प्रतिनिधी । उच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार सोमवार ८ जून पासून न्यायालयाचे कामकाज काही प्रमाणात सुरु झाले आहे. वकिलांना ५० लाखांचा विमा कडून संरक्षण कवच द्यावे अशी मागणी भुसावळ वकील तालुका संघाचे अध्यक्ष तुषार पाटील, उपाध्यक्ष धनराज मगर, सचिव रम्मु पटेल आदींनी केली आहे.

देशात व राज्यात कोरोनाने थैमान घातला असल्याने अत्यंत चिंताजनक व भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या या वातावरणात यापुर्वी पोलीस, डॉक्टर, आर.पाटील , नर्स, तसेच आशा वर्कर यांना महाराष्ट्र शासनाने ५० लाखाचे विमा कवच प्रदान केलेले आहे. लोकशाहीच्या आधारस्तंभा पैकी न्याय व्यवस्था हा एक आधार स्तंभ आहे. वकील हे समाजाचे महत्वाचे घटक असुन न्याय व्यवस्थेचा एक अविभाज्य अंग आहे. सामान्य नागरीकाला न्याय मिळवून देण्याचे काम हे वकीलांमार्फत होत असते. वकील देत असलेली सेवा ही एक समाजसेवेचा प्रकार आहे. या परिस्थितीमध्ये न्यायालय सुरु झाले असले तरीही वकीलांना स्वतःची व त्याच्या परिवाराची काळजी असेलच. अशा परिस्थितीमध्ये काम करतांना वकीलांकडुन सामान्य नागरीकांना न्याय मिळवुन देण्याच्या कामामध्ये महत्वाची भुमीका असते. गेल्या ३ महिन्यापासुन लॉक डाऊन असल्यामुळे वकीलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. त्यांची महत्वाची भुमीका बजावत असतांना वकीलांना शासनाकडुन कुठलेही आर्थिक संरक्षण कवच मिळालेले नाही. तरी शासनाला आमची विनंती आहे की, लोकशाहीचा आधार स्तंभ असलेला न्याय व्यवस्थेमधील वकील मंडळी ही महत्वाचा घटक असल्याने वकीलांना| सुरक्षा कवच म्हणुन रु.५० लाखाचा विमा शासनातर्फे काढुन देण्यात यावा.

Protected Content