चाकूने वार करून कुटुंबातील तिघांना मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील धामणगाव येथील बसस्थानक येथे काहीही एक कारण नसतांना कुटुंबातील तीन जणांना चाकूने वार करत मारहाण केल्याची घटना बुधवार २० मार्च रोजी रात्री ११ वाजता घडली. याप्रकरणी गुरूवार २१ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, यश कैलास सपकाळे वय १८ रा.धामणगाव ता.जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवार २० मार्च रोजी रात्री ११ वाजता गावातील बसस्थानकजवळ उभा होता. त्यावेळी काहीही एक कारण नसतांना किरण विलास सपकाळे, निलेश उर्फ राजू सपकाळे, राजू रघुनाथ सपकाळे आणि यश राजू सपकाळे सर्व रा. धामणगाव ता. जळगाव यांनी यश कैलास सपकाळे याला हातातील चाकूने वार करून दुखापत केली. त्यानंतर यशचे वडील कैलास पकाळे आणि भाऊ राकेश सपकाळे हे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांना देखील चौघांनी बेदम मारहाण करून दुखापत करत धमकी दिली. याप्रकरणी गुरूवारी २१ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता यश कैलास सपकाळे याने दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे किरण विलास सपकाळे, निलेश उर्फ राजू सपकाळे, राजू रघुनाथ सपकाळे आणि यश राजू सपकाळे सर्व रा. धामणगाव ता. जळगाव यांच्याविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नरेंद्र पाटील हे करीत आहे.

Protected Content