Home क्राईम मंगल कार्यालयात चोरीप्रकरण; एकाला अटक

मंगल कार्यालयात चोरीप्रकरण; एकाला अटक

0
123
crime-2

crime 4 3

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कानळदा रोडवरील लक्ष्मीनगरातील क्षत्रिय परदेशी साळवी समाजाच्या समाज मंगल कार्यालयातून भांड्यासह साऊंड सिस्टीम असा 46 हजार रुपयांचा एैवज चोरी झाला होता. शहर पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्यात पोलिसांनी शेख समीर उर्फ बोची शेख फकीर मोहम्मद वय 20 रा.गेंदालाल मिल याला सोमवारी अटक केली आहे. त्याच्याकडून 17 हजाराची भांडे जप्त करण्यात आली असून न्यायालयात हजर केले असता त्याला 20 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

चोरीप्रकरणी हिरालाल रुपचंद फरसे वय 68 रा. शिवाजीनगर यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात 14 मार्च रोजी गुन्हा दाखल झाला आहे. यात शेख समीर, शंकर विश्‍वनाथ साबणे, शोएब (पूर्ण नाव माहित नाही) सर्व रा. गेंदालाल मिल, असे तीन संशयित निष्पन्न झाले होते. शहर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी शेख समीर याच्या मुसक्या आवळल्या. त्याने साथीदारासह गुन्ह्याची कबूली दिली असून दोन लोखंडी कढाया, 5 नग अल्युमिनियमचे झाकण, 3 अल्युमिनियमची भांडे, ताब्यांची मोठी डेग, 3 हजार रुपयांची 2 पितळाचे मोठे बघोणे असा 17 हजाराचा एैवज जप्त केला आहे. संशयिताला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यात 20 पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. स्वाती निकम यांनी काम पाहिले.


Protected Content

Play sound