शेलवडजवळ ट्रॅक्टर उलटल्याने शेतकर्‍याचा मृत्यू

shelvad accident

बोदवड प्रतिनिधी । तालुक्यातील शेलवडजवळ ट्रॅक्टर उलटल्याने सोपान नामदेव चौधरी या शेतकर्‍याचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.

सोपान नामदेव चौधरी व आनंदा त्र्यंबक शिंदे हे सुरवाडा येथील दोघे शेतकरी रासायनिक खत घेवुन जात असताना शेलवड जवळ ट्रॅक्टर पलटी जाले. शेतकरी सोपान नामदेव चौधरी याचा जागीच मुत्यु झाला व आनंदा त्र्यबक शिदे हे गंभीर जखमी झाले असुन बोदवड येथिल खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत.
मयताचे शव विच्छेदन बोदवड येथिल ग्रामिण रूग्णालयात करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात तिन मुली व ऐक मुलगा पत्नी,आई-वडील असा परिवार आहे. दरम्यान, या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाने बेजबाबदारपणा दाखविल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

Protected Content