जळगावात जुगार अड्ड्यावर छापा; चार जणांसह दहा वाहने ताब्यात

crime 7

जळगाव प्रतिनिधी । औद्योगिक वसाहत परिसरातील एम-सेक्‍टरमधील भारत पेट्रोलियमच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या पथकाने छापा टाकला. यात पथकाने चार जुगाऱ्यांसह तब्बल दहा वाहने ताब्यात घेतली.

भारत पेट्रोलियमशेजारील मोकळ्या जागेत जुगारअड्डा चालवला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून डॉ. निलाभ रोहन यांच्या पथकातील मुकेश पाटील यांच्यासह क्‍यूआरटी पथकाने छापा टाकला. चारही बाजूंनी घेराव घालून घटनास्थळावरून मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. संशयितांमध्ये अंकुश अशोक गवळी (वय 40, रा. गवळीवाडा शनिपेठ), दीपक सोनार, गजानन हटकर, सचिन सोनार यांच्यासह 10 ते 15 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छापा पडल्याची चाहूल लागताच रोख रकमेसह इतर सर्व पळून जाण्यात यशस्वी ठरले. तर चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

10 हजार सुझूकी (एमएच 19 ई 5677), 30 हजार स्प्लेंडर (एमएच 19 सीएम.3034), 70 पल्सर(विनानंबरप्लेट), 20 हजार, स्प्लेंडर (एमएच.19.ए.एफ.2387), 35 हजार स्प्लेंडर (एमएच.19.बीआर.8046), 40 हजार हिरो एचएफ डीलक्‍स (एमएच.19.सीएन.3187), होंडा ऍक्‍टीवा(एमएच.19.अेएस.8197), 15 हजार स्प्लेंडर(एमएच.19.बीएन0080), 25 हजार रुपयांची डीस्कव्हर (एमएच.19.बी.टी.318), 30 हजारांची पॅशन प्रो(एमएच.19.बीपी.2811), 25 हजारांची डीस्कव्हर (एमएच.19.बीसी.7177), 3 लाख 50 हजारांची बलेनो कार (एमएच.19.पी.2222), 50 हजारांची ऑटो रिक्षा (एमएच.19.व्ही.8347),5 हजार रुपयांची इन्व्हर्टर बॅटरी, 500 रुपयांचा सीएफएल बल्ब, 100 रुपयांचा इलेक्‍ट्रीक वायर होल्डर, पत्त्यांचा कॅट, चटई, पाण्याचा जार असा एकुण 7 लाख 35 हजारांचा ऐवज पोलिस पथकाने जप्त केला आहे.

Protected Content