तलवारीने दहशत माजविणाऱ्याला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात बेकायदेशीर हातात तलवार घेवून दहशत पसरविणाऱ्या संशयिताला जळगाव शहर पोलीसांनी सोमवारी अटक केली आहे. त्यांच्याजवळून लोखंडी तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक प्रकाश भोसले (वय-२७) रा. गेंदालाल मिल, जळगाव असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात संशयित आरोपी दिपक भोसले हा बेकायदेशीरित्या हातात लोखंडी तलवार घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने सोमवारी २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कारवाई करत संशयित आरोपी दिपक भोसले याला अटक केली. त्याच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय निकुंभ करीत आहे.

Protected Content