रोझोदा येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

सावदा ता. रावेर (प्रतिनिधी) । रावेर तालुक्यातील रोझोदा येथील तरूणाने राहत्या घरात अत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी सावदा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

सचिन जगन्नाथ फेगडे (वय-३९) रा. रोझोदा ता. रावेर असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. सावदा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन फेगडे हा रोझेदा ता. रावेर येथे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २६ डिसेंबर रोजी सचिन हा घरात एकटा असतांना दुपारी दीड वाजेच्या सुमारास घराच्या वरच्या मजल्यावर दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. नातेवाईक घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी धनराज पाटील यांच्या खबरीवरून सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पोहेकर करीत आहे.

Protected Content