आदीवासी कुटुंबातील विद्यार्थ्यीनीला वस्तीगृहात प्रवेश मिळण्याबाबत निवेदन

यावल, प्रतिनिधी | येथील आदीवासी कुटुंबातील विद्यार्थीनींला वस्तीगृहात प्रवेश मिळावा यासाठी प्रकल्प अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

शिरपूर तालुक्यातील कु. ऐश्वर्या मोतिराम पावरा (इयत्ता नववी) या विद्यार्थ्यीनीला शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह चोपडा येथे प्रवेश मिळत नसल्याने प्रवेश मिळावा या आशयाचे निवेदन प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे ( एकात्मीक आदीवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल ) यांच्याकडे केली आहे. सदर निवेदन हे आखिल भारतीय आदीवासी विकास परिषद व्दारे देण्यात आले आहे. निवेदनात दुर्बड्या पो . वकवाड तालुका शिरपुर येथील राहणारी विद्यार्थीनींनी माध्यमिक विद्यालय चोपडा ता.चोपडा जि.जळगाव येथे मागच्या वर्षी इयत्ता-आठवी या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला होता. परंतु अद्याप पर्यंत शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृहात प्रवेश साठी अर्ज संबंधित कार्यालयात सर्व कागदपत्रे जमा केले आहेत. तरीही सदर विद्यार्थीनीला अद्याप पर्यंत प्रवेशा बाबत कळालेले नाही. तरी यदा वर्षी इयत्ता-९ वीत प्रवेश असून विद्यार्थीनीची आर्थिक परिस्थिती ही हालाखीची लक्षात घेवून तिला तात्काळ वसतिगृहात प्रवेश द्यावे अन्यथा सदरची विद्यार्थीनी ही आखिल भारतीय आदीवासी विकास परिषदच्या माध्यमातुन वसतिगृहा समोर बेमुदत आमरण उपोषणाला बसणार असल्याचा ईशारा देण्यात आला आहे.

Protected Content