यावल येथे शैक्षणीक संघनाटनांचे यावल तहसीलसमोर धरणे आंदोलन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्य शासनाच्या दत्तक शाळा योजना तसेच खाजगीकरण व कंत्राटीकरण या निर्णयाच्या विरोधात यावल तालुक्यातील सर्व शैक्षणिक संघटनांनी यावल तहसीलदार कार्यालयासमोर एकदिवसी धरणे आंदोलन करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, ० ते २० पटसंख्येच्या शाळा बंद करणे बाबत धोरण रद्द करा, शाळांचे खाजगीकरणाचा निर्णय रद्द करा, विविध विभागातील कंत्राटी करणाचा निर्णय रद्द करा, जुनी पेन्शन योजना लागू करा या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

वेळी तालुका मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष जयंत चौधरी, उपाध्यक्ष बाळू पाटील, मुख्याध्यापक व्हि.जी.तेली, तालुका टी.डी.एफ संघटनेचे अध्यक्ष किरण झांबरे, तालुका सचिव सुधीर चौधरी, उपाध्यक्ष अश्विनी कोळी, जिल्हा ज्युनिअर कॉलेज संघटनेचे अध्यक्ष नंदन वळीकार व नगरपालिका उच्च माध्यमिक संघटनेचे अध्यक्ष के.टी. तळेले, प्रोटॉनचे गणेश काकडे, उपाध्यक्ष अजय पाटील, मुख्याध्यापक डी.व्हि.चौधरी, नितीन झांबरे, डी.व्हि. पाटील, एस.डी.पाचपोळे, समाधान भोई, संघटक के.जी.चौधरी, पप्पू वानखेडे, चेतन तळेले, प्रशांत सोनवणे, युवराज पाटील, चंद्रकांत चौधरी, सिद्धेश्वर वाघुळदे, एस आर सोनवणे, उर्दू संघटनेचे जलील अहमद, शेख मकसुद शेख ईब्राहीम, एस एम मोमीन, एस के खान, एच.ए.शेख, महिला पदाधिकारी सुधा पाटील, विजया पाटील, यु. डी. पाटील, श्रीमती चोपडे, श्रीमती एस ए वाणी, पी एम बडगुजर सर्वपदाधिकारी संघटनेचे सदस्य शिक्षकेतर संघटना उपाध्यक्ष अनिल चौधरी ,शिक्षक संघटनेचे फारूख सर बहुसंख्येने उपस्थित होते.

Protected Content