मू.जे.महाविद्यालयाच्या चैतन्य २०२३-२४ चे थाटात उद्घाटन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मूळजी जेठा महाविद्यालयाच्या “चैतन्य २०२३-२४ “या स्नेहसंमेलनाच्या उदघाटन मोठ्या थाटात करण्यात आले. विविध छंद व ललित कला प्रदर्शनी ठिकाणी दोनदिवसीय स्नेहसंमेलनाचे दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे, स्नेहसंमेलनप्रमुख डॉ.संगीता पाटील, विज्ञान विद्याशाखा प्रमुख डॉ.के.जी.खडसे, सामाजिकशास्त्र संचालक प्रा.देवेंद्र इंगळे ,भाषा प्रशाळा संचालक डॉ.भूपेंद्र केसुर, वाणिज्य विद्याशाखा प्रमुख प्रा.सुरेखा पालवे, व्यवस्थापन विद्याशाखा प्रमुख प्रा.अब्दुल आरसीवाला, आयक्यूएसी समन्वयक डॉ. केतन नारखेडे, रेडीओ मनभावन ९०.८ एफ. एम. चे संचालक अमोल देशमुख, सर्वोत्कृष्ट विद्यार्थी कांचन लक्ष्मण पाटील व प्रिन्सिपल रोल ऑफ ऑनर पारितोषिकप्राप्त विद्यार्थी तसेच विविध छंद व ललित कला समितीप्रमुख डॉ.स्वप्नाली वाघुळदे, समिती सदस्य ,विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.

स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो व त्यातूनच विद्यार्थी सर्वार्थाने समृद्ध होतो, असे प्रतिपादन जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार यांनी केले. मूळजी जेठा महाविद्यालयाच्या “चैतन्य २०२३-२४ “या स्नेहसंमेलनाच्या उदघाटनप्रसंगी बोलत होत्या.

उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर महाविद्यालयातील मुख्य रंगमंच, फूड फेस्टिवल व रक्तदान शिबिराच्या ठिकाणी मान्यवरांनी भेटी देवून शुभेच्छा दिल्या. दिवसभरात मुल्जियन गायक भाग-१, अंताक्षरी, एकांकिका, प्रश्नमंजुषा, एकल-युगल समूह नृत्ये, हास्यप्रधान खेळ,काव्यवाचन, कथाकथन व उत्स्फूर्त भाषण या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे सादरीकरण झाले. स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी २२ समितीप्रमुख व समिती सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत.

Protected Content