शांतिगिरी महाराज समर्थकांसह लोकसभेच्या रिंगणात

जळगाव प्रतिनिधी । महामंडलेश्‍वर शांतिगिरीची महाराज यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची जाहीर घोषणा शहरात झालेल्या निर्धार सभेत दिली.

राजकारणाच्या शुद्धिकरणासाठी शहरातील सागरपार्क मैदानावर सत्संग, प्रवचन व निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले. जगद्गुरू जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी महामंडलेश्‍वर शांतीगिरी बाबा यांच्या प्रेरणेने राज्यातील ९ लोकसभा मतदारसंघांमध्ये आपल्या अनुयायांना निवडणूक लढविण्यासाठी मैदानात उतारणार आहेत. राजकारण हे चांगल्या माणसाचे काम नाही, असा गैरसमज का झालेला आहे? श्रीमंत अधिक श्रीमंत, तर गरीब अधिक गरीब होत आहेत. राजकारणात दरवर्षी नवीन चेहरे येतात. ते पाच वर्षांत आपल्या सात पिढ्यांसाठी संपत्ती संग्रही करतात. आज आपल्याकडे संविधानाने मतदान रुपी शस्त्र दिले आहे. त्या शस्त्राचा वापर करून अचूकपणे मतदान केले तर शुद्ध राजकारणी निवडून येतील. त्यासाठी सुशिक्षित, संस्कारी उमेदवाराला १०० टक्के मतदान केल्याने चांगले उमेदवार निवडून येतील असे त्यांनी जळगाव येथील सभेत सांगून आपल्या राजकारणातील प्रवेशाचे संकेत दिले.

Add Comment

Protected Content