सावदा शहरात ‘धन्यवाद मोदीजी उपक्रम’

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्‍यांतर्फे धन्यवाद मोदीजी उपक्रमाच्या अंतर्गत सुमारे दोन हजार पोस्टकार्ड पाठविण्यात आलेत.

जळगाव जिल्हा बेटी बचाओ बेटी पढाओ अभियाना अंतर्गत व भारतीय जनता पार्टी तर्फे ग्राम विकास मंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री न.गिरीश महाजन, जिल्हा अध्यक्ष आ राजु मामा भोळे, खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेष दादा पाटील,बेटी बचाओ बेटी पढाओ चे राष्ट्रीय संयोजक डॉ राजेंद्र फडके , महाराष्ट्र प्रदेश संयोजिका डॉ शुभा पाध्ये, उत्तर महाराष्ट्र प्रभारी अल्फाताई अग्रवाल , जिल्हा उपाध्यक्ष नंदुभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली धन्यवाद मोदी जी कार्यक्रमाच्या माध्यमातून सावदा शहर व परीसरातुन दोन हजार पोष्ट कार्ड पाठवण्यात आले.

करोना महामारी दरम्यान इतर देश जनतेकडे दुर्लक्ष करत होते तेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून नागरीकांना मानसिक आधार दिला व आर्थिक मदत केली. तसेच सर्व नागरिकांना मोफत लसीकरण करून त्यांचे प्राण वाचवले म्हणुन जनतेने त्यांचे पोष्ट कार्ड च्या माध्यमातून आभार मानले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी बेटी बचाव बेटी पढाओ च्या जिल्हा संयोजक सारीका चव्हाण, सावदा भाजप शहरध्यक्ष जे.के. भारंबे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सागर चौधरी, सावदा भाजप सरचिटणीस महेश अकोले युवा मोर्चा सावदा शहर अध्यक्ष सर्वेश लोमटे , भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन बेटी बचाओ बेटी पढाओ च्या जिल्हा संयोजक सारीका चव्हाण यांनी केले होते.

Protected Content