अरे व्वा… ‘येथे’ उभारला जाणार सचिनचा पुतळा !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिग्गज क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर याचा भव्य पुतळा लवकरच उभारण्यात येणार आहे.

क्रिकेटचा देव म्हणून ख्यात असणार्‍या आपल्या लाडक्या सचिनचा Sachin Tendulkar लवकरच भव्य पुतळा उभारण्यात येणार असून याबाबतचे सूतोवाच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांनी केले आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिलेली आहे.

या मुलाखतीत ते म्हणाले की, वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकरचा भव्य पुतळा बसवण्यात येणार आहे. या पुतळ्याचे अनावरण २३ एप्रिलला सचिन तेंडुलकरच्या ५० व्या वाढदिवसाला किंवा यंदाच्या विश्वचषकादरम्यान केले जाऊ शकते. लक्षणीय बाब म्हणजे सचिन हा मुंबईकर असून त्याने आपल्या कारकिर्दीतला शेवटचा सामना याच मैदानावर खेळला होता. तर वानखेडे स्टेडियमवरील हा पहिलाच पुतळा असणार आहे. हा पुतळा उभारण्यासाठी सचिनची संमती घेण्यात आली असून लवकरच याचे अनावरण करण्यात येणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content