छावा मराठा युवा महासंघातर्फे शिवजयंती निमित्त क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

 

जळगाव, प्रतिनिधी । शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधत छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . यावेळी आर्यन प्ले स्कुलच्या विद्यार्थ्यांनी कराट्यांचे चित्तथरारक प्रात्यक्षिक , शिवकालीन वेशभूषा , शिवाजी महाराजांबद्दलचे उत्तम वक्तृत्व आणि कथ्थक व इतर नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

महापौर सौ. भारती सोनवणे यांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण होऊन प्रमुख अतिथींनी दीपप्रज्वलन व अभिवादन करीत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी केले. त्यात ते म्हणाले की , छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे राष्ट्र निर्माण करायचे असेल, तर बालपणापासुनच मुलांवर शिव संस्कार व्हायला हवे. तसेच त्यांना क्रीडा व व्यायामाची गोडी लागावी व ते बलशाली व्हावेत म्हणूनच अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केलेले आहे.

यावेळी प्रमुख अतिथी उपमहापौर सुनील खडके , लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे , महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे , राजेश ( गोगा शेठ ) मुंदडा , राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन धांडे , सरीता कोल्हे , डॉ. सुषमा चौधरी , नगरसेविका मिनाक्षी पाटील आदि उपस्थित होते. मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या जिवनातील वेळवेगळ्या प्रसंगाचे संदर्भ देत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणेर यांनी केले . आभार अमोल कोल्हे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर्यन प्ले स्कुलचे अजय काशीद , मोनिका चौधरी, राजेश इंगळे, संकेत वारुळकर, अमन तडवी, जितेंद्र पाटील, सुजाता मॅडम आणि छावा मराठा युवा महासंघाचे किरण ठाकूर, आकाश धनगर, कृष्णा जमदाडे, सागर मोतीराडे यांनी परिश्रम घेतले. पारितोषिक वितरण अमोल कोल्हे , मुकुंदभाऊ सपकाळे , गोगा सेठ मुंदडा , डॉ. दिपक चौधरी , हरिश्चंद्र सोनवणे सर , डॉ. सुषमा चौधरी , कृष्णा माळी व छावाचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले .

Protected Content