उज्वला गॅसच्या ग्राहकांनी गॅस दरवाढीला कंटाळून पुन्हा थाटल्या चुली

जामनेर, प्रतिनिधी  ।  केंद्र सरकार प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच दुसरा टप्पा सुरु करण्याच्या तयारीत असतांना गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडल्याने गरीब व सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने गॅस  सिलेंडर ग्राहक पुन्हा चुलीकडे वळताना दिसत आहेत.  

 

केंद्र सरकारकडुन उज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला. यात काही अटीमध्ये सवलत देण्यात आली आहे. कोणतीही अनामत रक्कम न भरता अल्प उत्पन्न कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळणार आहे. मात्र, गॅस सिलेंडरच्या किमतीं गगनाला भिडल्याने सरकार मोफत गॅस कनेक्शन देऊनही सर्वसामान्य कुटुंबांना गॅस सिलेंडर भरणे कठीण झाले आहे. चुलीच्या धुरापासून गरीब व सर्व सामान्य महिलांची सुटका व्हावी. यासाठी केंद्र शासनाचा वतीने प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना अंतर्गत जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण देशात उज्वला गॅस योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात सर्वात जास्त कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आली. व जामनेर तालुक्यात  ग्रामीण व दुर्गम भागातील कुटुंबांना देखील यामध्ये गॅस सिलेंडर दिला. सुरुवातीला व कोरोना काळात या लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडर देण्यात आले. परंतु गेल्या काही महिन्यात गॅस सिलेंडरचे प्रचंड दर वाढल्याने तब्बल घरात पोहोचलेली गॅस सिलेंडर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. यामुळेच या सर्व लाभार्थ्यांना पुन्हा चुलींवरच स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. मे २०१६ मध्ये ही योजना सुरू झाली. त्यानंतर एक-दोन वर्षात सर्व पात्र लाभार्थ्यांना योजना पोहोचण्यात यश आले. गॅस जोडणी दिल्यानंतर शासनाच्या वतीने लाभार्थ्यांना मोफत सिलेंडर दिले. त्यानंतर मोफत सिलेंडर बंद झाल्यानंतर ६०% टक्के लाभार्थी केवळ पाहुणे आले किंवा घाईच्या वेळीच याचा वापर करीत होते. आता उज्वला गॅसचे  बहुतेक सर्व लाभार्थी पुन्हा चुलीकडे वळाले आहेत. कोरोनामुळे सर्व सर्वच गोष्टी महागल्या आहेत रोजचा घर खर्च करणे आटोक्याबाहेर गेले आहे गॅस सिलेंडरचा दर ८४६ रुपयांवर पोहचला आहे. (घरगुती गॅस सिलेंडरचे दर) जानेवारी -२०२०- ५७०रु.  जुलै -२०२०- ६०० रुपये जानेवारी-२०२१-७०६ रुपये  फेब्रुवारी-२०२१-७७५ रुपये ऑगस्ट २०२१-८४६रुपये

Protected Content