वन्यजीव संरक्षण संस्थेची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । वन्यजीव संरक्षण संस्थेची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज रविवार २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शिवकॉलनीतील शारदाश्रम विद्यालयात घेण्यात आले. यावेळी मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक तर प्रमुख मार्गदर्शक उपवन संरक्षक श्री विवेक होशिंग यांची उपस्थिती होती. 

वन्यजीव संरक्षण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उस्थाहात संपन्न , सर्पमित्र ओळखपत्र मिळवण्यासाठी पाठपुरावा करणे, शून्य सर्पदंश अभियान खान्देशात व्यापक स्तरावर राबविणे, सर्पमित्र विमा संरक्षण मिळवण्या साठी प्रयत्न करणे, संशोधन कार्य बळकट करणे, आदी ठराव मंजूर ऑक्टोबर मध्ये होणार सेव्ह सातपुडा जनजागृती रॅली आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्वसाधारण सभेत महत्वाच्या ठरावाना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.  यावेळी रवींद्र सोनवणे, विजय रायपुरे  यांनी मागदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात बाळकृष्ण देवरे यांनी संस्थेची भूमिका स्पष्ट केली. संस्थेचे भविष्यातील नियोजन प्रस्ताव रूपात मांडले. यात सर्पमित्रांना वनविभागातर्फे ओळखपत्र देणे, 1 ते 7 ऑक्टोबर वन्यजीव सप्ताह यावल आणि जळगाव वनविभागासोबत साजरा करणे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एरंडोल वनक्षेत्रात विकसित केलेल्या बंधाऱ्यांची पिचिंग आणि प्लॅंटेशन साठी वनविभागास प्रस्ताव देणे, या विषयावर चर्चा करून प्रस्ताव मंजूर करण्यात आले. सूत्रसंचालन बाळकृष्ण देवरे यांनी केले, आभार प्रदर्शन सतीश कांबळे यांनी केले.  संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे राहुल सोनवणे, अमन गुजर, गौरव शिंदे, प्रसाद सोनवणे यांच्यासह २४ सर्पमित्रांना गौरवपत्र देऊन गौरवण्यात आले. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश ढाके , राजेश सोनवणे ,ऋषी राजपूत, दिनेश सपकाळे, चेतन भावसार, सुरेंद्र नारखेडे, गणेश सपकाळे,अभि ठाकूर, अरुण सपकाळे, हेमराज सोनवणे, मुकेश सोनार, संतोष चौधरी, रवींद्र भोई, कल्पेश तायडे, भुपेंद्र तळेले, बापू कोळी किरण सपकाळे  यांनी परिश्रम घेतले. आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जळगाव, भुसावळ, चोपडा, अमलनेर, पाचोरा, जामनेर, भडगाव, वरणगाव, धरणगाव, एरंडोल, बोदवड  नासिक नंदुरबार येथून 75 कार्यकर्ते उपस्थित होते

 

Protected Content