दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी त्वरित मिळावी : सुरज पाटील

WhatsApp Image 2019 07 13 at 3.38.38 PM

भुसावळ प्रतिनिधी | राज्यातील टंचाईग्रस्त भागातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्याचा शासनाचा निर्णय असला तरी त्याच्या अंमलबजावणीस विलंब करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे. भुसावळ युवासेना शहर प्रमुख सुरज पाटील यांच्या नेतृत्वात उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांची भेट घेऊन दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी त्वरित मिळावी अशी मागणी केली.

 

याप्रसंगी तालुका प्रमुख हेमंत बऱ्हाटे, युवासेना शहर समन्वयक स्वप्निल पवार, शहर चिटणीस मयुर जाधव, उप शहरप्रमुख भुषण सोनार, उप शहरप्रमुख पवन बाक्से, दुर्गेश जाधव, गौरव पवार, म्रुगेन कुलकर्णी, शुभम गावंडे यांच्या उपस्थित जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना पत्र पाठवून पात्र विद्यार्थ्यांचा अहवाल पाठविण्याची सुचना केली होती. परंतु कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही.शिक्षण विभागाची ही ढिसाळ अंमलबजावणी पहाता विद्यार्थ्यांना शुल्क परत मिळणारच नाही असे वाटत आहे, त्यामुळे एकुणच पालक व विद्यार्थी वर्गात नाराजीचे वातावरण आहे. तरी याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा युवासेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शहर प्रमुख सुरज पाटील यांनी दिल्यानंतर उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्वरित कार्यवाहीचे आदेश दिले.

विद्यार्थी व पालकांनी युवासैनिकांना संपर्क करावा:
महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना परीक्षा फी एप्रिल महिन्यातच मिळणे अपेक्षित होते. शाळा महाविद्यालय सोबत शिक्षण विभागाच्या ढिसाळ कामगिरीमुळे कोट्यवधी रुपयांची मदत दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मिळाली नाही. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या कार्यालयातुन पुढील आठवड्यात फी दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे. परिसरातील विद्यार्थी व पालकांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन सुरज पाटील यांनी केले आहे.

Protected Content