चाळीसगाव येथे कृषी विद्यापीठाची स्थापना करण्याची मागणी

rayat sena chalisgaon

जळगाव प्रतिनिधी । नवीन कृषी विद्यापीठ केळीचे माहेरघर असलेल्या जळगाव येथे स्थापन करण्याच्या निर्णयास तत्वत: मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुसावळ येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यता देवून निर्णय झाला असल्याचे सांगीतल्याने सदर कृषी विद्यापिठाची स्थापना चाळीसगाव येथे करावी, अशी मागणी जळगाव जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांच्याकडे १५ रोजी रयत सेनेने निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की,
महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ म्हणून 1968 साली महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना राहुरी, अहमदनगर येथे झाली. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र पश्चिम महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या दहा जिल्ह्यांत विस्तारलेले आहे. कृषी विद्यापीठाचे प्रमुख उद्दिष्ट कृषीशिक्षण, कृषीसंशोधन आणि कृषीविस्तार कार्य आहे.कृषी साक्षरतेसाठी विद्यापीठामार्फत कृषी पदविका, कृषी पदवी, पदव्युत्तर व आचार्य पदवीचे शिक्षण दिले जाते. दरवर्षी विद्यापीठ आपल्या कार्यक्षेत्रात शेतकरी, कृषी अधिकारी आदींसाठी विविध प्रशिक्षण वर्ग, शेतकरी मेळावे, प्रात्यक्षिके यांचे आयोजन करते. याव्यतिरिक्त आकाशवाणी, दूरचित्रवाणी, वर्तमानपत्रे, मासिके आदींमधून हंगामनिहाय, क्षेत्रनिहाय, शेतीविषयक तंत्रज्ञान व विविध कार्यक्रम प्रसारित करत असते. जळगाव येथे कृषी विद्यापीठ स्थापन करावे अशी मागणी तत्कालीन महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली आहे.

चाळीसगाव तालुका चार जिल्ह्यांच्या सिमेवर आहे. दळणवळणाच्या दृष्टीने याचा फायदा धुळ्याला देखील होईल चाळीसगाव रेल्वे स्टेशन मोठे असल्याने येथुन सगळीकडे अगदी तासाभरात जाता येता येते त्यामुळे त्याचा फायदा सर्वांनाच होईल. चाळीसगाव तालुक्यातील खडकी शिवारात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा अंतर्गत एमआयडीसी विकसीत झाली असून दोन मोठ्या कंपन्या स्थापन झाल्या आहेत.खडकी शिवरात ६०० ते ७०० एकर शेती तर खडकी शिवाराला लागूनच बिलाखेड शिवारात ५०० एकर शेती आहे.त्यामुळे कृषी विद्यापीठासाठी लागणाऱ्या जमिनीचा प्रश्न सुटेल. त्यामुळे नियोजीत कृषी विद्यापीठ चाळीसगाव येथे झाल्यास ते अधिक परीणामकारक ठरेल. त्यामुळे परिसरातील कृषी क्षेत्राला चालना मिळून शेतीला चांगले दिवस येतील. या बाबींचा विचार करून हे कृषी विद्यापीठ चाळीसगाव येथे स्थापन व्हावे याची गरज आहे.

कृषी विद्यापीठामुळे नाशिक, नगरचा जसा फायदा झाला तसाच धुळे, नंदूरबार व जळगाव मिळून ३२ तालुके व जवळच्या नांदगाव-मालेगाव तालुक्यांनाही होईल. चाळीसगाव येथे कृषी विद्यापीठासाठी सर्व सोई सहज उपलब्ध असल्याने याचा गांभीर्याने विचार करावा व कृषी विद्यापिठ चाळीसगाव येथे स्थापन करण्याची मागणी रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रत कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री जळगाव, एकनाथराव खडसे माजी मंत्री जळगाव, आमदार चाळीसगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत. निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश समन्वयक पि एन पाटील, जिल्हाध्यक्ष संजय कापसे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष दिपक राजपुत, तालुकाध्यक्ष किशोर पाटील, शहराध्यक्ष योगेश पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Add Comment

Protected Content